अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान सुशांत आणि रियामध्ये फोनवरुन झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या क्लिपच्या आधारावर केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार सुशांत आर्थिक संकटात सापडला होता. सध्या सीबीआयमार्फत या ऑडिओ क्लिपची फॉरेंसिक तपासणी सुरु आहे.

या टीव्ही अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ची कोट्यवधींची ऑफर; कारण…

काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?

इंडिया टुडेने ही ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. या क्लिपमध्ये सुशांत आणि रिया दोघं एका आर्थिक तज्ज्ञाशी चर्चा करत आहेत. सुशांत आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे तो सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याचा विचार करत होता. त्याला आपले उर्वरीत पैसे इतर ठिकाणी गुंतवायचे होते. त्याच दरम्यान त्याने आपले पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावे असं रिया त्याला सुचवत होती. अशा आशयाचं संभाषण या क्लिपमध्ये केलं जात आहे. अर्थात ही क्लिप खरी आहे की खोटी याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सीबीआय मार्फत या ऑडिओ क्लिपचा फॉरेंसिक तपास सुरु आहे.

‘ब्लॅक पँथर’च्या शेवटच्या ट्विटनं रचला विक्रम; ट्विटरनं देखील केला ‘किंग ऑफ वकांडा’ला सलाम

यापूर्वी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.