News Flash

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी १० दिवसांचा जामीन मंजूर

गेल्या महिन्यातच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती.

(photo-file/instagram/sidharth pithani)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला नुकतच एक वर्ष पूर्ण झालंय. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी अद्याप तपास सुरु असून अनेक जणांची चौकशी सुरू करण्यात येतेय. गेल्या महिन्यातच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु असताना सिद्धार्थचं नाव समोर आल्याने एनसीबीने सिद्धार्थला अटक केली. 26 जूनला सिद्धार्थचं लग्न असल्याने त्याने लग्नासाठी कोर्टाकडे जामिनाची मागणी केली होती.

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थला १० दिवसांचा जामीन मंजूर झाला आहे. सिद्धार्थला 8 जून ते 2 जुलै दरम्यान अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. लग्न समारंभासाठी त्याला हा जामीन मंजूर करण्यात आलाय. या शिवाय सिद्धार्थने २ जुलैला सरेंडर होण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth pithani (@pithanisiddharth)

एनसीबीकडून समन्स पाठवून देखील त्याला कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने 28 जुलैला हैदराबादमधून सिद्धार्थला अटक करण्याक आली होती. सिद्धार्थच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा तपास केला गेला आणि त्याला अटक करण्यात आली होती.

हे देखील वाचा: नीति मोहनने शेअर केली मुलगा आर्यवीरची पहिली झलक; क्यूट फोटो पाहून अनुष्का शर्मा म्हणाली…

सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंह राजपूतच्या तपासातील महत्वाची व्यक्ती आहे. कारण १४ जून २०२० रोजी ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली तेव्हा सिद्धार्थ घरातच होता. सिद्धार्थ पिठानी सोबतच ड्रग्ज प्रकरणात सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत. रिया चक्रवर्ती तसचं शोविक चक्रवर्ती यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सिद्धार्थ वगळता इतर सर्वांना जामिनावर सोडण्यात आलंय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह पहिल्यांदा पाहणाऱ्यांमध्ये सिद्धार्थचं नावं आहे. सिद्धार्थ आणि सुशांत एकत्र राहत असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 11:48 am

Web Title: sushant singh rajput room mate siddharth pithani grant 10 days interim bail for his wedding kpw 89
टॅग : Bollywood,Entertainment
Next Stories
1 नीति मोहनने शेअर केली मुलगा आर्यवीरची पहिली झलक; क्यूट फोटो पाहून अनुष्का शर्मा म्हणाली…
2 ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
3 नोराचा अनोखा बिकिनी लूक पाहून वरुण धवनला हसू अनावर, पाहा व्हिडीओ
Just Now!
X