26 February 2021

News Flash

आज येणार ‘केदारनाथ’चा टिझर!

उत्तराखंडमध्ये जो महाप्रलय आला होता त्याचाही संदर्भ या सिनेमात असणार आहे

'केदारनाथ'

आज दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ या सिनेमाचा टिझर येणार आहे. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाचे एक पोस्टर ट्विट केले आहे. तसेच याच ट्विटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे की या सिनेमाचा टिझर आज दुपारी बारा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kedarnath… Teaser out at 12 noon tomorrow… Directed by Abhishek Kapoor…

सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफची मुलगी या सिनेमातून पदार्पण करते आहे. हा सिनेमा ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सारा अली खानला प्रेक्षक स्वीकारतील का हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच ठरणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. केदारनाथ ही एक प्रेमकहाणी आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचाही संदर्भ या प्रेमकथेला असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 4:25 am

Web Title: sushant singh rajput sara ali khans kedarnath to release on december 7 teaser out on october 30
Next Stories
1 ‘सेक्स वर्करला तुम्ही आई म्हणून वाईट ठरवाल का?’
2 १४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘विठ्ठल’
3 Bigg Boss 12 : श्रीसंतवर सबा खानचा ‘डर्टी गेम’चा आरोप
Just Now!
X