News Flash

…म्हणून सुशांत सारा अली खानसोबत करणार नाही काम

सुशांतने दिलेल्या नकारामुळे त्या दोघांमध्ये भांडणे सुरु असल्याचे म्हटले जात आहे

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे नाते चांगले खुलले होते. दरम्यान त्या दोघांच्या नात्याच्या चर्चादेखील सुरु होत्या. मात्र आता दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडली असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतने सारासोबत काम करण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटानंतर सारा आणि सुशांतच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु आईच्या सांगण्यावरुन सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली. अखेर सुशांत आणि साराच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

नुकताच सारा आणि सुशांतला एका जाहिरातीसाठी एकत्र कास्ट करण्यात आले होते. मात्र या जाहिरातीमध्ये सुशांतने सारासोबत काम करण्यास साफ नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतने दिलेल्या नकारामुळे त्या दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतला एक्स गर्लफ्रेंडसोबत काम करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

रिया आणि सुशांतला अनेकदा एकत्र डिनर डेटवर जाताना आणि फिरताना पाहिले आहे. तर दुसरीकडे सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत. साराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्तिक बँकॉकला देखील गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 4:23 pm

Web Title: sushant singh rajput says no to work with sara avb 95
Next Stories
1 दिग्दर्शकाच्या विनंतीनंतरही ‘साहो’च्या कमाईत कमालीची घसरण
2 ..म्हणून रवीनाचं अक्षयशी होऊ शकलं नाही लग्न
3 अभिषेक बच्चनने विवेक ओबेरॉयला मारली मिठी; व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X