News Flash

”सुशांत तू योग्य केलं नाहीस”; खास फोटो पोस्ट करत शाळेने वाहिली श्रद्धांजली

पाहा, सुशांतचा कधीही न पाहिलेला खास फोटो

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. मात्र या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. यात सुशांतच्या शाळेकडूनदेखील त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सुशांतच्या शाळेने सोशल मीडियावर त्याचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

कलाविश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सुशांतने पाटणामधील सेंट केरन्स हायस्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्याच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर शाळेने त्याचे मित्रांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो शाळेच्या शेवटच्या दिवशी काढला असून त्यात त्याच्या वर्गातील सगळे विद्यार्थी दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुशांत त्याच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

“माहित नव्हतं तू कोणत्या परिस्थितीचा सामना करत होतास. पण हे योग्य केलं नाहीस. तुझी कायम आठवण येईल”, असं कॅप्शन या फोटोला शाळेने दिलं आहे. शाळेच्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, शाळेत असताना सुशांत हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे उत्तम अभिनयशैलीमुळेही त्याने कलाविश्वात स्थान निर्माण केलं होतं. पीके, एम.एस. धोनी, छिछोरे,केदारनाथ या चित्रपटातून त्याने अभिनयाची झलक दाखविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 11:34 am

Web Title: sushant singh rajput school patna pays heartfeltt ribute late actor ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर १२ दिवसांनी वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
2 टिकटॉक स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; कुटुंबीयांचा खुलासा
3 सुशांतच्या Social Media Account वर पोलिसांना शंका; मागवली मागील सहा महिन्यांची माहिती
Just Now!
X