News Flash

‘मला माफ कर’; सुशांतच्या आठवणीत बहिणीची भावूक पोस्ट

श्वेताने का मागितली असेल माफी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्याच्या या निर्णयामुळे कलाविश्वावर आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यातच सुशांतच्या बहिणीने श्वेताने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत सुशांतची माफी मागितली आहे.

काही दिवसापूर्वीच श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिच्या लहान मुलाने तिला दु:खातून सावरण्यासाठी तिचं सांत्वन कसं केलं होतं, हे सांगितलेलं. तिची ही पोस्ट फार चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिने आणखीन एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांतची माफी मागितली आहे.

“आज तू देहरुपाने आमच्यात नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. तुला खूप त्रास होत होता, हेही मला माहित आहे. पण तू एक लढवैय्या होतास हेही तितकंच खरं आहे. मोठ्या धैर्याने तू सगळ्याला सामोरं जात होतास. मला माफ कर. तुला ज्या-ज्या त्रासातून जावं लागलं, त्या सगळ्यासाठी मनापासून माफी मागते. जर माझ्या हातात असतं, तर तुझी सारी दु:ख मी स्वत: वर घेतली असती आणि माझा सगळा आनंद तुला दिला असता”, अशी पोस्ट श्वेताने शेअर केली आहे.

पुढे ती म्हणते, “तुझ्या चमकत्या डोळ्यांनी जगाला स्वप्न पाहायला शिकवलं. तुझ्या निखळ हास्यातून तुझं मन किती निष्पाप होतं हे दिसायचं. तुझ्यावर कायम असंच प्रेम असेल..निरंतर प्रेम. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदात रहा”.

दरम्यान, सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्य आल्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या मृत्युनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 1:15 pm

Web Title: sushant singh rajput sister apologizes to brother by writing emotional post on facebook ssj 93
Next Stories
1 असंवेदनशील… सुशांतच्या आत्महत्येवर बनवलं भोजपुरी गाणं; अभिनेत्री संतापली
2 ‘तारक मेहता..’मध्ये काम करण्यासाठी ‘आत्माराम तुकाराम भिडे’ यांनी सोडली होती दुबईतील नोकरी
3 International Space University ने सुशांतला वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Just Now!
X