News Flash

‘पवित्र रिश्ता २’ वर सुशांतच्या बहिणीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; लिहिला भावूक संदेश

'पवित्र रिश्ता २' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांत सिंह राजपूतच्या ऐवजी अभिनेता शाहिर शेख दिसणार आहे. यावर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने आपली प्रतिक्रिया दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून ‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका बरीच चर्चेत आलीय. या मालिकेच्या पहिल्या सीजनमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण मालिकेचा दुसरा सीजन ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांत सिंह राजपूतच्या ऐवजी अभिनेता शाहिर शेख दिसणार आहे. ‘पवित्र रिश्ता २’ वर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने आपली प्रतिक्रिया दिलीय.

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केलीय. या स्टोरीमधून तिने ‘पवित्र रिश्ता २’ मधील स्टारकास्टसाठी एक इमोशनल मेसेज लिहिलाय. श्वेताने अभिनेता शाहिर शेख आणि अंकिता लोखंडे या दोघांचा एक फोटो सुद्धा शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना श्वेताने लिहिलं, “ही मालिका पुन्हा सुरू होतेय, याचा मला खूप आनंद होतोय. पवित्र रिश्ता २ मालिकेच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..”. तर अंकिता लोखंडेचा फोटो शेअर करत तिने मालिकेच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचं सांगितलं.

shweta-singh-Kirti-has-sent-her-best-wishes-to-the-Pavitra-Rishta-2 (Photo: Instagram/shwetasinghkirti) shweta-singh-Kirti-Instagram-stories (Photo: Instagram/shwetasinghkirti)

श्वेताने शेअर केलेल्या या स्टोरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुशांतचे फॅन्स तसंच सोशल मीडियावर सर्व युजर्स श्वेताच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेली ‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका ११ वर्षापूर्वी प्रसारित झाली होती. जवळजवळ चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर आठ वर्षापूर्वीच ही मालिका बंद केली होती. त्यानंतर प्रेक्षक या मालिकेच्या दुसऱ्या सीजनसाठी मागणी करत होती. त्यामूळे मालिकेच्या मेकर्सनी दुसरा सीजन ‘पवित्र रिश्ता २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. नुकतंच या मालिकेतील अंकिता लोखंडे आणि अभिनेता शाहिर शेख या दोघांनी आपल्या लूकची एक झलक प्रेक्षकांसमोर सादर केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 10:22 pm

Web Title: sushant singh rajput sister shweta pavitra rishta 2 reaction prp 93
Next Stories
1 खरंच प्रेग्नंट आहे सोनम कपूर ? या फोटोंना पाहून युजर्स गोंधळले
2 ….म्हणून राहुल-दिशाच्या लग्नाला जाणार नाही राखी सावंत
3 १९४ दिवसात ३०१ पारितोषिके पटकाविणारी सोन्याहून पिवळी ‘काळी माती’!
Just Now!
X