अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होत आहे. यासाठी रिया ईडी कार्यालयात पोहोचली. रियावर सुशांतच्या वडिलांनी पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

‘असं कुणीतरी म्हणून गेलंय की, तुम्ही कुणाच्या आयुष्याशी खेळ करतायेत याची काळजी घ्या. कारण आध्यात्मिक जगात त्याचं कोण संरक्षण करतंय हे तुम्हालाही माहिती नाही,’ अशी पोस्ट श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिली.

आणखी वाचा : श्रुती मोदी आहे तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा

सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर ईडीने रियाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसंच रियासोबत सुशांतची एक्स बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीदेखील चौकशी होणार आहे.