News Flash

सुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ

हा व्हिडीओ म्हणजे सुशांतच्या अनेक आठवणींचा एक संग्रहच आहे.

सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे सुशांतच्या अनेक आठवणींचा एक संग्रहच आहे. गिटार वाजवण्यापासून, चित्र काढेपर्यंत सुशांतच्या अनेक आठवणी या व्हिडीओत एकत्रित केल्या आहेत.

सुशांत प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होता, हे या व्हिडीओतून सतत दिसून येत आहे. खेळ असो, अभ्यास असो किंवा मग अभिनय.. सुशांतने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली होती. या व्हिडीओच्या शेवटी सुशांत त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत गोविंदाच्या गाण्यावर मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत सिंह तणावात असल्याने आत्महत्या केल्याचा दावा वारंवार केला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने चौकशीही करत आहेत. अनेकांनी सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनंदेखील त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:25 pm

Web Title: sushant singh rajput sister shweta singh kirti shares an emotional video ssv 92
Next Stories
1 ‘बाहुबली’ला मिळाली बॉलिवूडची ‘देवसेना’!
2 जिमनॅस्टिक रिंगवर वर्कआउट करण्यात आमिरची लेक दंग; व्हिडीओ होतोय व्हायरल
3 नव्या जाहिरातीमुळे सैफ-करीना चर्चेत; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Just Now!
X