News Flash

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; “महेश भट्ट, करण जोहरच्या मॅनेजरची होणार चौकशी”

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत जवळपास २५ पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास करण जोहर आणि त्याच्या मॅनेजरची देखील चौकशी केली जाईल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर महेश भट्ट यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. ते घराणेशाहीला दुजोरा देत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. मात्र, आता या प्रकरणात महेश भट्ट यांचीच चौकशी होणार आहे. तसेत अनिल देशमुख यांनी गरज पडल्यास करण जोहरची देखील चौकशी करण्यात येईल असे म्हटले आहे. यापूर्वी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, चित्रपट समीक्षक राजीव मसंद अशा अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 5:57 pm

Web Title: sushant singh rajput suicide anil deshmukh says mahesh bhatt karan johar statement will be recorded avb 95
Next Stories
1 बिग बींचा जलसा झाला कंटेन्मेंट झोन फ्री; मुंबई महापालिकेने उतरवला बोर्ड
2 “…म्हणून ‘दिल बेचारा’वर टीका करु नका”; नवाजुद्दीनची समिक्षकांना भावूक विनंती
3 टायगर श्रॉफची आई संतापली, अनुराग कश्यपला मागावी लागली माफी
Just Now!
X