News Flash

‘करण जोहर कोण आहे? काय कचरा…’ सुशांतच्या आत्महत्येनंतर बबिता फोगट संतापली

तिने ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. पण सुशांतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सुशांतच्या निधनावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने ट्विट करत करण जोहरवर निशाणा साधला आहे.

बबिताने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘कोण आहे करण जोहर? त्याने इंडस्ट्रीमध्ये काय कचरा पसरवला आहे. ही फिल्म इंडस्ट्री त्याची नाही. त्याला सडेतोड उत्तर का देत नाहीत? एक माझी बहिण कंगना आहे जी या सर्वाला उत्तर देते. करण आणि त्याच्या गँगच्या सर्व चित्रपटांवर बहिष्करा टाण्यात यावा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे असे धक्कादायक व्यक्तव्य केले होते. आता बबिताने कंगनाला पाठिंबा देत एक ट्विट केले आहे.

‘बहिण कंगना रणौतचे बोलणे मला योग्य वाटते. जे लोकं छोट्या शहरातून येतात त्या लोकांसोबत भेदभाव केला जातो जे नाही झाले पाहिजे’ असे बबिताने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 1:58 pm

Web Title: sushant singh rajput suicide case babita phogat salms karan johar avb 95
Next Stories
1 “हा तर त्याचा अपमान”; सुशांतबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर संतापला सैफ
2 ‘ती अजूनही धक्क्यात’; सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली साराची अवस्था
3 सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील घराणेशाहीविरोधात प्रकाश राज यांनी उठवला आवाज; म्हणाले…
Just Now!
X