27 February 2021

News Flash

Video : एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये आईच्या आठवणीने भावूक झाला होता सुशांत

जुना व्हिडीओ होतोय पुन्हा व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच सुशांतचा एका रिअ‍ॅलिटी शोमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शोमध्ये सुशांत आईच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

सुशांतने छोट्या पडद्यावर काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने ‘झलक दिखलाजा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. शोमध्ये एका परफॉर्मन्समुळे त्याला आईची आठवण आली होती आणि तो भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी येते. त्यावेळी तेथे बॉलिवूड अभिनेत्री माधूरी दीक्षित परिक्षक म्हणून उपस्थित असते. ती सुशांतला समजावते.

दरम्यान माधूरीने सुशांतला तिच्या मोठ्या मुलाचा किस्सा देखील सांगिते. ‘माझा मुलगा आणि मी, एक दिवस असच सोफ्यावर बसले होतो. माझा मुलगा मला म्हणाला जेव्हा मी बाहेर होतो त्यावेळी मला काही वाटले नाही. पण आता मी तुला भेटायला आलोय तेव्हा मला जाणवतय की मी तुला किती मिस केले. मी तुझ्या भावना समझू शकते’ असे माधूरी म्हणते.

‘मी देवाचे आभार मानते की आज माझे आई-वडिल माझ्यासोबत आहेत. तुझी आई जिकडे कुठे असेल ती तुला पाहत असेल. तिचा आशिर्वाद कायम तुझ्यासोबत असणार. तिला तुझा अभिमान असेल’ असे माधुरी पुढे म्हणते.

सुशांतच्या आईचे २००२मध्ये निधन झाले होते. त्यावेळी सुशांत केवळ १६ वर्षांचा होता. सुशांतने आत्महत्या करण्याआधी देखील इन्स्टाग्रामवर आईसोबतचा फोटो शेअर केला होता. ती त्याची शेवटी पोस्ट होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 7:30 pm

Web Title: sushant singh rajput throwback video actor cried remembering his mom avb 95
Next Stories
1 निव्वळ योगायोग… सुशांत सिंग राजपूत, इरफान खान आणि ‘जोकर’मधील साम्य दाखवणार फोटो व्हायरल
2 ‘आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांचा विचार करा’ अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल
3 “आत्महत्या करण्याआधी आई-वडिलांचा विचार करा”; सिद्धार्थचा मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X