28 September 2020

News Flash

‘दिल बेचारा’च्या सेटवर झालं होतं सुशांत- संजनाचं भांडण; पाहा व्हिडीओ

जाणून घ्या, सुशांत- संजनामधील वादाचं कारण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट दिल बेचारा अलिकडेच प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून सुपहिट ठरलेला हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये रोज नवीन चर्चा रंगते.यातच सध्या दिल बेचाराच्या सेटवरील संजना आणि सुशांत यांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात संजना सुशांतवर चिडल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संजना आणि सुशांत स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत. यावेळी सुशांतने सिगारेट पकडतात त्या स्टाइलमध्ये तोंडात पेन धरला होता. हे पाहून संजना रागावल्याचं दिसून आलं. अशा स्टाइलमध्ये पेन पकडून एकदम रजनीकांत झाल्याप्रमाणे वाटत असेल ना. इथे लाखो लोक कर्करोगाने जीव गमावत आहेत, असं संजना म्हणाली.


दरम्यान, या दोघांमधील हा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे दिल बेचारा या चित्रपटातून अशाच कर्करोगग्रस्त मिनी आणि किझीची कथा उलगडण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 11:37 am

Web Title: sushant singh rajput used pen as cigarette sanjana sanghi angry on it video viral on internet ssj 93
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मध्ये होणार दया बेनची एण्ट्री?
2 ‘फुटपाथवरील जीवन जगताना..’; अमित साधने सांगितली स्ट्रगल काळातील आठवण
3 ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक असिम रियाजवर अज्ञातांनी केला हल्ला
Just Now!
X