बॉलिवूड अभिनेता सुशांत सिहं राजपूत हा दिग्दर्शक करण जोहरवर नाराज होता. त्याच्या नाराजीचं कारण नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘ड्राईव्ह’ चित्रपट आहे. या चित्रपटाला करण जोहरने प्रोड्यूस केलं होतं. सुशांतला या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, या सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. या सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं. धर्मा प्रोडक्शनच्या या निर्णयावर सुशांत अत्यंत नाराज होता. सुशांतचा टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीने हा खुलासा केल्यानंतर याबाबतचं सत्य उघड झालं.

सुशांतच्या मृत्यूच्या आधी त्याचा टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीसोबत संपर्क झाला होता. १३ जून रोजी सुशांतसोबत उदय एका कॉन्फरन्स कॉलवर पुढच्या प्रोजक्ट्सवर चर्चा करत होता. या कॉन्फरन्स कॉलवर फिल्म प्रोड्यूसर निखील अडवाणी हे देखील सामील होते. मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर आधारित हा प्रोजेक्ट होता. यात मुंबई पोलिस, आयएसआय आणि दहशतवादी अजमल कसाब हे विषय घेतले जाणार होते.

इतकंच नव्हे तर टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीने एक पार्टी देखील आयोजित केली होती. यात करण जोहर, प्रोड्युसर सुनील खेतरपाल यांच्यासह इतर काही प्रोड्यूसर आणि दिग्दर्शक येणार होते. मुंबई पोलिसांसह इतर तपास यंत्रणांनी उदय सिंह गौरीचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्याने करण जोहरवर आरोप केला. सुशांत सिंह राजपूत ‘ड्राईव्ह’ चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहर आणि तरुण मनसुखानी यांच्यावर नाराज होता, असं उदयने सांगितलं. यापुढे बोलताना उदय म्हणाला, धर्मा प्रोडक्शनच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटातून त्याच्या अपेक्षेप्रमाणे हवा तितका चित्रपट चालला नाही. करण जोहरने सुशांता कल्पना न देता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला आणि हेच कारण होतं की ज्यामुळे सुशांत करण जोहरवर नाराज झाला.

सुशांतला संजय लीला भन्साळींनी दोन नव्हे तर चार चित्रपटांची ऑफर सुशांतला दिली होती. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’,’बाजीराव-मस्तानी’, ‘रीड’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात सुशांतला घेण्यासाठी भन्साळी प्लॅन करत होते. रामलीलाच्या वेळी सुशांत सिंह राजपूतचा YRF (यशराज फिल्म्स) सोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये होता आणि ‘पानी’ चित्रपटाच्या वर्कशॉपमध्ये भाग घेत होता. ज्यामुळे त्याने रामलीला करण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे बाजीराव-मस्तानी, रीड, आणि पद्मावतसाठी भन्साळींनी सुशांतला संपर्क केला होता, पण त्याने आपल्या सर्व तारखा ‘पानी’ या चित्रपटासाठी दिल्या होत्या, असं देखील उदयने म्हटलंय.

आणखी वाचा: “प्लीज माझ्याकडे परत ये…!”; सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची इमोशनल पोस्ट

उदयची सुशांतसोबत सगळ्यात शेवटची भेट ही १६ मार्च २०२० रोजी झाली होती. त्यावेळी त्याच्या घरी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि वडिल इंद्रजित चक्रवर्ती हे सगळे दिसून आले होते.

पाच यत्रणांनी तपास करूनही सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काय निष्कर्षापर्यंत पोहोचतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.