12 December 2019

News Flash

कॅन्सरग्रस्त चाहत्याच्या मदतीसाठी ऑनस्क्रीन धोनी पुढे सरसावला

सुशांतने यापूर्वी केरळ पूरग्रस्तांनादेखील मदत केली होती.

सुशांत सिंह राजपूत

छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज बॉलिवूडमधील एक नावाजलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच सुशांत समाजकार्य करण्यामध्येही अग्रेसर असल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुराने थैमान घातलं होतं. त्यावेळी सुशांतने येथील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता एका कर्करोग ग्रस्त चिमुरड्यासाठीदेखील सुशांत पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

सुशांतचा सध्या फॅनफॉलोअर्स कमालीचा वाढला असून लहानांपासून थोरांपर्यंत सारेच त्याची भेट घेण्यासाठी आतूर असतात. अशातच ब्लड कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका चिमुरड्याने सुशांतची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. Ketto India या क्राऊड फंडिंग संस्थेने या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याची इच्छा स्पष्ट केली आहे. या मुलाचं नाव ऐरन असं असून या संस्थेने या पोस्टमध्ये सुशांतला टॅग केलं आहे.

सुशांतला ज्यावेळी या मुलाच्या आजारपणाची आणि त्याची इच्छा समजली त्यावेळी तात्काळ त्याने उत्तर देऊन मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘या चिमुरड्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन आणि तो लवकरात लवकर बरा व्हावी हेच मागणं मागेन’, असं म्हणतं सुशांतने संबंधित संस्थेकडे ऐरन आणि त्याच्या कुटुंबाची माहिती मागितली असून त्याला मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच त्याच्या अन्य चाहत्यांनादेखील ऐरनची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, सुशांत अनेक वेळा गरजू व्यक्तींना मदत करताना दिसून आला आहे. विशेष म्हणजे सुशांतचा हाच स्वभाव चाहत्यांना आवडत असून सध्या त्याच्यावर कौतुकांचा वर्षावर होत आहे.

First Published on November 16, 2018 1:51 pm

Web Title: sushant singh rajput will help blood cancer survivor kid aaron
Just Now!
X