अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं वेगळं वळणं घेतलं आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यात जामीन मिळवण्यासाठी रियानं अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे. झूम टीव्हीनं हे वृत्त दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी त्यांच्या मृत्युनंतर तब्बल दीड महिन्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरूद्ध फिर्याद दाखल केली. पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बिहार पोलीस सध्या मुंबईत तपासासाठी दाखल झाल्याचं वृत्त आहे. रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबरोबरच इतरही गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी रिया चक्रवर्तीनं प्रयत्न सुरू केले असून, अभिनेता सलमान खान व संजय दत्तची बाजू मांडणारे नामांकित वकील सतीश मानशिंदे यांना बाजू मांडण्यासाठी नेमले आहे. सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी अभिनेता सलमान खान व संजय दत्त या दोघांच्या केस लढल्या आहेत.

काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान व १९९३मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तची बाजू मांडणारे वकील मानशिंदे अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस लढणार आहेत. मानशिंदे यांनी रियाच्या अटकपूर्व जामीनाचे कागदपत्र तयार केले असून, मंगळवारी रात्री त्यांच्या सहाय्यक वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घराबाहेर दिसल्या होत्या.

रियानं केलं आत्महत्येस प्रवृत्त

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या प्रकरणात रियाविरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला,” असं सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे.