22 September 2020

News Flash

सुशांत सिंहची सहकलाकार संजनाने सोडली मुंबई, विमानतळावरुन पोस्ट करत म्हणाली…

संजना सांघीने घेतला मुंबईचा निरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सहकलाकार संजना सांघी मुंबई सोडून आपल्या घरी दिल्लीला गेली आहे. संजनाने बुधवारी संध्याकाळी विमातळावरील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत मुंबईचा निरोप घेतला. आपण दिल्लीला जात असल्याची माहिती यावेळी तिने दिली. यावेळी संजनाने लवकरच भेटू, कदाचित नाही असं सांगत पुन्हा मुंबईला परतणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. संजनाने सुशांत सिंहसोबत ‘दिल बेचारा’ चित्रपटात काम केलं आहे. सुशांत सिंहचा शेवटचा ठरलेला हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

संजनाने विमानतळावरील आपला सेल्फी शेअर करत लिहिलं आहे की, “बाय मुंबई, चार महिन्यानंतर तुझं दर्शन झालं. मी पुन्हा दिल्लीला जात आहे. तुझे रस्ते थोडे वेगळे दिसत आहेत, ते मोकळे आहेत. कदाचित माझ्या मनातील दु:ख माझ्या पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. किंवा कदाचित तुदेखील दु:खात आहेस”. या पोस्टच्या शेवटी संजनाने “लवकरच भेटू, कदाचित नाही” असं म्हटलं आहे.

संजनाने २०११ मधील ‘रॉकस्टार’ चित्रपटासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात रणबीर कपूर आणि नर्गिस मुख्य भूमिकेत होते. संजनाने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. दिल बेचारा चित्रपटातून संजना पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ जुलै रोजी हा चित्रपट डिस्नी+हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 8:44 am

Web Title: sushant singh rajputs co star sanjana sanghi leaves mumbai for hometown sgy 87
Next Stories
1 चित्र रंजन ; दंतकथेत गुंफलेले वास्तव
2 सोनम कपूरच्या बहिणीला मिळाली जीवे मारण्याची धमकी, इन्स्टाग्रामवर संतापून म्हणाली…
3 ‘त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो, पण…’; मनोज वाजपेयीने सांगितला स्ट्रगलिंगचा अनुभव
Just Now!
X