23 September 2020

News Flash

परिणितीसोबत सुशांतचा ‘ताकडम’

'शुद्ध देसी रोमान्स'फेम जोडी सुशांत सिंग राजपूत आणि परिणिती चोप्रा होमी अदाजानियाच्या 'ताकडम' मध्ये.

'ताकडम'साठी दिग्दर्शक होमी अदाजानियासोबतच सुशांत आणि परिणितीसुद्धा फारच उत्सुक आहेत

‘शुद्ध देसी रोमान्स’फेम जोडी सुशांत सिंग राजपूत आणि परिणिती चोप्रा होमी अदाजानियाच्या ‘ताकडम’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती खुद्द सुशांत व परिणिती यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. क्रिती सॅननसोबतच्या ‘राबता’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने त्याच्या या नवीन ‘ताकडम’ बद्दल काही माहिती देत या बातमीवर मोहोर लावली. सध्या परिणितीसुद्धा तिच्या एका दक्षिण भारतीय चित्रपटासोबतच ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. बहुप्रतिक्षित ‘मेरी प्यारी बिंदू’ मधून तिची आणि आयुष्मान खुराणाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत या चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती ‘ताकडम’च्या दिग्दर्शकांनी ट्विटरवरुन दिली. अशा या ‘ताकडम’साठी दिग्दर्शक होमी अदाजानियासोबतच सुशांत आणि परिणितीसुद्धा फारच उत्सुक आहेत, असंच दिसतंय.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 4:16 pm

Web Title: sushant singh rajputs next film takadum with parineeti chopra
Next Stories
1 बक-याची कत्तल म्हणजे ‘कुर्बानी’ नाही- इरफान खान
2 शाहरुख-सलमानची सायकल स्वारी
3 मराठमोळा सलमान
Just Now!
X