अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी (७ ऑगस्ट) ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाल्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. त्यातच सुशांतच्या बहिणीने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चिली जात आहे.

शुक्रवारी रिया चक्रवर्ती, तिचे वडील आणि भाऊ यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिने एका पांढऱ्या कागदावर सुशांतला न्याय मिळेल असं लिहिलं आहे.


“आपलाच विजय होईल. देव आपल्यासोबत आहे”, असं श्वेताने लिहिलं आहे. या पोस्टपूर्वी श्वेताने शंकराचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे सध्या श्वेताच्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर विशेष चर्चिल्या जात आहेत.

वाचा : ‘आशा करते तुम्ही दोघं..’; सुशांतसाठी अंकिताची भावनिक पोस्ट

वाचा :  रिया चौकशीदरम्यान सहकार्य करत नाही?; संतापलेल्या वकिलांनी दिलं ‘हे’ उत्तर

दरम्यान,सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला होता. त्यामुळे याच प्रकरणी रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. मात्र रिया चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हती असंही म्हटलं जात आहे.