News Flash

सुशांतच्या बहिणीने दिल्या अंकिता लोखंडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सुशांतच्या बहिणीने दिल्या अंकिता लोखंडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकताच तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला. अंकिताने तिचा वाढदिवस कुटुंबीय आणि छोट्या पडद्यावरील काही कलाकारांसोबत साजरा केला. अंकिताच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेतासिंह कीर्तीने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर कमेंट करत अंकिताने धन्यवाद म्हटले आहे.

श्वेताने अंकितासोबत एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्वेताने निळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे तर अंकिताने लाल रंगाचा टॉप परिधान केला आहे. श्वेता फोटो शेअर करत म्हणाली, “नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणाऱ्या स्त्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मला आशा आहे की तू नेहमी आनंदी आणि सुखरूप राहशील.” त्यावर धन्यवाद म्हणत अंकिता म्हणाली, “दीदी तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस. तू एक अशी व्यक्ती आहे जी मला नेहमी योग्य मार्ग दाखवते.”

दरम्यान, या आधी अंकिताने तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अंकिताच्या बर्थडे पार्टीला छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. त्या व्हिडीओमुळे अंकिताला ट्रोल देखील करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 7:40 pm

Web Title: sushant singhs sister wished ankita lokhande on her birthday dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे स्टारडम टिकू शकले नाही, गोविंदाने केला होता खुलासा
2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलेत का?
3 सोनू सूद पुन्हा चर्चेत; मंदिर उभारत ग्रामस्थांनी व्यक्त केली कृतज्ञता
Just Now!
X