03 December 2020

News Flash

सुशांत सिंहच्या वडिलांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही; वकिलांचा खुलासा

बुधवारी या घटनेला वेगळ वळण आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, बुधवारी या घटनेला वेगळ वळण मिळालं. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंह गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सिंह यांच्या वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे. सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलीस करत असलेल्या तपासावर विश्वास नाही,” असं वकील विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सुशांतच्या वडिलांची बाजू मांडणारे वकील विकास सिंह यांनी ‘सीएनएन न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ‘सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस करत असलेल्या तपासावर सुशांतच्या कुटुंबीयांचा विश्वास नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात एका प्रोडक्शन हाऊसचे नाव घेण्यासाठी कुटुंबावर दबाव आणला जात आहे” असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली. बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं वृत्त आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी जामिनासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:29 pm

Web Title: sushants family do not trust the mumbai police said by advocate vikas sing avb 95
Next Stories
1 ‘अधीरा’चा नवा अवतार; ‘केजीएफ चॅप्टर – २’ मधील संजयचा लूक आला समोर
2 Viral Video: करोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर रडले
3 रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस करत होते टाळाटाळ- सुशांतचे वकील
Just Now!
X