News Flash

सुषमा स्वराज यांच्या आठवणीने बॉलिवूडही हळहळले

त्यांचे अचानक जग सोडून जाणे फार वेदनादाई आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

मी लहान असताना सुषमाजी यांचा मला भरपूर पाठिंबा होता. माझ्या ऑफीसमध्ये मी त्यांची बरीच छायाचित्रे लावली आहेत. त्या माझ्यासाठी आईप्रमाणे होत्या. त्यांनी मला माझ्या जीवनाचा पहिला धडा शिकवला. त्यांचे अचानक जग सोडून जाणे फार वेदनादायी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. असे ट्विट करुन प्रसिद्ध निर्माता एकता कपूर हिने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एकता कपूर व्यतिरिक्त बमन इरानी, रितेश देशमुख, अमिताभ बच्चन, दिया मिर्झा, करण जोहर, तापसी पन्नो, अदनान सामी या कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 10:35 am

Web Title: sushma swaraj amitabh bachchan riteish deshmukh karan johar ekta kapoor mppg 94
Next Stories
1 #MeToo : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करणार नाही – दीपिका
2 …जेव्हा सुषमा स्वराज यांनी चित्रपटाच्या सेटवर केली होती एण्ट्री
3 एकांकिकेची ‘हवाच’ न्यारी
Just Now!
X