29 September 2020

News Flash

Photo : सुष्मिता सेनने उरकला साखरपुडा ?

सुष्मिताने रोहमनसोबत साखरपुडा केल्याचं म्हटलं जातं आहे

सुष्मिता सेन, रोहमन शॉल

अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून कलाविश्वामध्ये सुरु आहे. त्यातच आता सुष्मिताने रोहमनसोबत साखरपुडा केल्याची नवीन चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. सुष्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरुन तिने खरंच रोहमनसोबत साखरपुडा केल्याचं दिसून येत आहे.

सुष्मिताने इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतचा एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये तिच्या बोटात एक अंगठी दिसत आहे. या फोटोला सुष्मिताने खास शब्दांत कॅप्शन दिल्यामुळे या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

“नात्यामध्ये अटी घालणं हा आपल्या सवयीचा भाग आहे. मात्र कोणत्याही अटीशिवाय प्रेम करणं खूप अवघड असतं.आपली बुद्धी कायम आपल्या मनावर कुरघोडी करत असते. त्यामुळे मनाचं ऐकणं आपल्याला कठीण जातं. आपली बुद्धी कायम आपल्याला नात्यांमध्ये अट घालायला शिकवते,तर मन कायम एखाद्यावर विश्वास ठेवायला शकतं. त्यामुळे अशावेळी प्रेम एखाद्या बोनससारखं वाटायला लागतं. मैत्री,प्रेम, सन्मान, विश्वास, सोबत आणि मनाचं हाक ऐकण्यासाठी मी बिनशर्त तुझी आहे रोहमन”, असं कॅप्शन सुष्मिताने या फोटोला दिलं आहे.

सुष्मिता आणि रोहमनची एका फॅशन इव्हेंटदरम्यान या भेट झाली होती. रोहमन सध्या तिच्या दोन मुलींसोबतही वेळ घालवत आहेत. जर साऱ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच सुष्मिता नव्या आयुष्याला सुरूवात करेल अशी आशाही तिच्या जवळच्या व्यक्तीनं व्यक्त केली. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 5:26 pm

Web Title: sushmita sen and rohaman shawl latest photo spread rumors about their engagement
Next Stories
1 Photo : चुलबुल पांडे परत येतोय, ‘दबंग ३’चं पोस्टर प्रदर्शित
2 रजनीकांत रमले क्रिकेटच्या मैदानात!
3 …त्यामुळे मी कोशात गेले होते – प्रिया बापट
Just Now!
X