News Flash

VIDEO: म्हणून सुश्मिता आहे परफेक्ट मॉम

सुश्मिताच्या निर्णयाची अनेकांनी प्रशंसाही केली होती.

छाया सौजन्य-इन्स्टाग्राम

अभिनेत्री सुश्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा बहुमान मिळवल्यानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सुश्मिता फक्त अठरा वर्षांची होती. रिनी ही जेव्हा तिच्या जीवनात आली त्यावेळी सुश्मिता अवघ्या २५ वर्षांची होती. त्यावेळी कोणत्याही कारणा शिवाय मुलींना दत्तक घेणयाचा सुश्मिताचा निर्णय पाहता त्यावर अनेकांची टीकाही केली होती. पण स्वावलंबी होण्याच्या मार्गावर असतानाच सुश्मिताने घेतलेल्या या निर्णयाची अनेकांनी प्रशंसाही केली होती.

सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मुलींसह सुश्मिता बॉलिवूडमधील विविध कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावत असते. सुश्मिता आणि तिच्या मुलींचे नातेही काही अनोखेच आहे. एक चांगली आई आणि चांगली अभिनेत्री होणे काय असते हे सुश्मिताने चांगलेच सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती एका लहान मुलीसोबत दिसत आहे. सुश्मिता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या वाढदिवशी हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री सुश्मिता सेनने आजवर विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही प्रेक्षक आजही तिला तितकीच पसंती देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:37 pm

Web Title: sushmita sen birthday age and why is she the best bollywood mom
Next Stories
1 ‘मंजुळाबाई उसने परतफेड’ बँकेवर उमटले नोटाबंदीचे पडसाद
2 खिलाडी कुमारचा हा चित्रपट सापडणार कायद्याच्या कचाट्यात?
3 रामानंद सागर यांच्या नातीच्या फोटोंचा सोशल मिडीयावर धुमाकूळ
Just Now!
X