03 March 2021

News Flash

Happy Birthday Sushmita Sen : या उत्तरामुळे सुष्मिता झालेली ‘मिस युनिव्हर्स’

सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा 'मिस यूनिव्हर्स'चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.

सुष्मिता सेन

माजी मिस यूनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज वाढदिवस. हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुष्मिताने १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. दोन मुलींची आई असलेल्या सुष्मिताने अजूनपर्यंत लग्न केले नाही. आज तिच्या वाढदिवशी जाणून घ्या तिच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टीः

-सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती.

-सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गातील मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता तिच्या आइने आणि मीना बाजारातील एका टेलरने मिळून शिवले.

-सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी आपली पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता.

-असे सांगितले जाते की, सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली. सुष्मिताचा सामना ऐश्वर्याबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघांनाही एकच प्रश्न विचारला गेला. दोघींना विचारण्यात आले की, जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने उत्तर दिले, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. असे मानले जाते की या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता.

-महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या सिनेमातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

-सुष्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते.

-सुष्मिताने हिंदी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती.

-सुष्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा सिनेमा फार गाजला होता. या सिनेमासाठी सुष्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 1:24 pm

Web Title: sushmita sen birthday special know some interesting and unknown facts about her
Next Stories
1 ‘भारत’च्या चित्रीकरणादरम्यान सलमान जखमी
2 ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचा पतीवर लैंगिक शोषणाचा आरोप
3 बॉक्स ऑफीसवर ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाची गाडी सुसाट
Just Now!
X