News Flash

Video : सुष्मिता सेन आणि रोहमन यांनी केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण

सुष्मितासोबतच तिचा बॉयफ्रेंड रोहमन आणि तिच्या मुलींनीदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे आणि हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

सुष्मिता सेन

सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका नवीन चॅलेंजची क्रेझ तरुणाईपासून बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये आहे. ‘बॉटल कॅप चॅलेंज’चे व्हिडीओ अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन यांनीदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

या चॅलेंजची सुरुवात अक्षय कुमारने केली होती. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅथमपासून प्रेरित होऊन बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनेही हे आव्हान स्वीकारले होते. हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्स, अभिनेता टायगर श्रॉफ, कुणाल खेमु, सिद्धार्थ चतुर्वेदी या बॉलिवूड कलाकारांनीदेखील ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण केले. बॉलिवूडमधील अभिनेत्री सुद्धा यामध्ये मागे नाहीयेत हे सांगण्यासाठी आता सुष्मिता सेननेदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

सुष्मिताने हे चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. सुष्मितासोबतच तिचा बॉयफ्रेंड रोहमन आणि तिच्या मुलींनीदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. सुष्मिताने संपूर्ण कुटुंबालाच या चॅलेंजचे वेड लावले आहे असे म्हणता येईल.

‘बॉटल कॅप चॅलेंज’मध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचे झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 10:13 am

Web Title: sushmita sen bottle cap challenge rohman djj 97
Next Stories
1 ‘कबीर सिंग’चे बॉक्स ऑफिसवर द्विशतक
2 आशा भोसले यांना स्वामीभूषण पुरस्कार
3 सेलिब्रिटींच्या जुन्या जाहिरातींचा खजाना व मजेदार किस्से
Just Now!
X