News Flash

हॅपी बर्थडे सुश्मिता सेन

आज ती ४१ वर्षांची झाली

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारताची पहिली मिस यूनिवर्स (१९९४) सुश्मिताचा आज वाढदिवस. आज ती ४१ वर्षांची झाली. सुश्मिताने १९ नोव्हेंबरच्या सकाळी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये सुश्मिता आपल्या आईसोबत शुभ्रा सेन आणि मुली रिनी आणि आलिशा यांच्यासोबत मौज मजा करताना दिसत आहे.
सुश्मिताने या फोटोंना छानसे मेसेजही दिले आहेत. सुश्मिता सध्या तिच्या कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. वाढदिवसाच्या दिवशी रिनी आणि अलिशा या मुलींनी तिला सरप्राईज केकही दिला. ज्यासाठी तिने आपल्या मुलींचे आणि आईचे आभार मानले.

सुश्मिताने १९९४ मध्ये जेव्हा मिस यूनिवर्स हा किताब जिंकला होता तेव्हा तिचे वय फक्त १६ वर्षे होते. २००४ मध्ये आलेला ‘मैं हूं ना’ या सिनेमात सुश्मिताने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:00 pm

Web Title: sushmita sen celebrated her birthday with mother and daughters
Next Stories
1 ..म्हणून मी आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नाही
2 आंतरराष्ट्रीय चित्रपटात शाहरुख-रणबीर दिसणार एकत्र
3 आमिर-आदित्यच्या भांडणासाठी आलिया कारणीभूत?
Just Now!
X