अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मॉडेल रॉमन श्वालला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाल्या आहे. काही दिवसांपूर्वी एका फॅशन इव्हेंटमध्ये रॉमन आणि सुष्मिता दोघंही एकत्र दिसले होते, तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘त्यांच्या नात्याबद्दल इतक्या लवकर काही बोलणं चुकीचं ठरेल, मात्र रॉमन आणि सुष्मितामधलं नातं हे मैत्री पलिकडचं आहे आणि लवकरच ते आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील’ अशी माहिती सुष्मिता आणि रॉमनच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. सुष्मिता ४२ वर्षांची आहे तर रॉमन २१ वर्षांचा आहे. सुष्मिता सिंगल मदर आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर तिनं काही वर्षांनी दोन मुलींना दत्तक घेतलं.

रॉमन सध्या रिनी आणि अलिशा या सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत वेळ व्यतीत करत आहे. योग्य वेळ आल्यानंतर ते दोघं आपलं नातं जगासमोर कबुल करतील असं म्हटलं जात आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. रणदीप सुष्मिताच्या दोन्ही मुलींची वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचा त्यामुळे सुष्मितासोबत नातं संपल्यानंतरही रणदीप खूपच नैराश्यात होता. मात्र आता रॉमनच्या येण्यानं सुष्मिता पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen dating model rohman shawl according to reports
First published on: 16-10-2018 at 17:06 IST