News Flash

सुष्मिताच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, करणार ‘या’ चित्रपटामध्ये काम

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराना करत आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळते. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, इशान खट्टर असे अनेक स्टारकिड्स सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. आता अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी ही देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती एका चित्रपटात भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे.

या चित्रपटाचे नाव ‘सुट्टाबाजी’ असे असून करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडानच्या काळावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जाते. लॉकडाउनच्या काळातील कुटुंबातील नात्यांवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात रिनी एका  बिघडलेल्या मुलीची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

#Suttabaazi Day 1

A post shared by kªƁǝǝƦ khuƦªƝª (@kabeerkhuranaofficial) on

या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराना करणार आहेत.

यापूर्वी सुष्मिता सेनने अनेक मुलाखतींमध्ये रिनीला भविष्यात अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती अभिनयाचे धडे घेत असल्याचे सांगितले होते. तसेच रिनीला गाण्याची देखील आवड असल्याचे सुष्मिताने सांगितले होते. त्यामुळे आगामी चित्रपटात ती गाणे गाणार असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 2:47 pm

Web Title: sushmita sen daughter renee is going to debut in bollywood avb 95
Next Stories
1 कौतुकास्पद! सोनू सूदने ऑनलाइन अभ्यासातील अडचण दूर करण्यासाठी गावात बसवला मोबाईल टॉवर
2 Video : ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन; हात जोडून म्हणाला…
3 Bigg Boss 14: सलमानच्या लग्नाबाबत ज्योतिषाने केली भविष्यवाणी
Just Now!
X