26 February 2021

News Flash

खऱ्या आई-वडिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..

सुष्मिताने २००० साली रेनेला दत्तक घेतलं आहे

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. अनेक वेळा ती तिच्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत असते. सुष्मिताने २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं. विशेष म्हणजे सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेनेने तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी वक्तव्य केलं आहे.

फिल्मी बीटने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत रेनेला तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी जाऊन घेण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रेनेने, “मला याची गरज वाटत नाही. सुष्मिता माझी आई आणि माझे सर्वकाही आहे. माझ्या खऱ्या आई-वडीलांसमोर वाईट परिस्थिती असेल म्हणून त्यांनी असे केले असेल किंवा आणखी काही असेल पण तो भूतकाळ आहे. हे माझं कुटुंब आहे. मी जे काही आहे ते या कुटुंबामुळे आहे. मला जे काही आर्शिवादाने मिळाले आहे ते या कुटुंबात. ज्या मुलांना त्यांच्या खऱ्या आई-वडीलांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांचा मी अनादर करत नाही. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या आई-वडीलां भेटून आनंद मिळत असेल तर तुम्ही नक्की भेटा. पण यामुळे मला आनंद मिळणार नाही” असे उत्तर दिले.

Video: गायिका प्रियांका बर्वेच्या चिमुकल्याची कमाल; आईला दिली गाण्यात साथ

पुढे ती म्हणाली, ” खरं प्रेम काय असतं हे मी पाहिलं आहे, माझ्यासाठी दत्तक घेतलेल बाळ आणि आपलं स्वत:च बाळ यात काही फरक नाही आहे. आणि मला तो फरक जाणवतही नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 3:31 pm

Web Title: sushmita sen daughter renee reveals why she never want to found out about her biological parents dcp 98 avb 95
Next Stories
1 सिद्धार्थ-मितालीच्या घरी लग्नाची लगबग; पाहा ग्रहमखाचे खास फोटो
2 ‘तांडव’बाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजू श्रीवास्तव नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
3 ‘मिर्झापूर-2’ मागील वादाचं ग्रहण कायम; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
Just Now!
X