News Flash

गॅरेजमधील टेलरनं शिवला होता सुष्मिताचा ‘मिस इंडिया’चा ड्रेस

सुष्मिताने सांगितला प्रेरणादायी अनुभव

सुष्मिता सेन बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ती मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती. तिने ‘मिस इंडिया’चा किताब देखील जिंकला होता. ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने एका साध्या टेलरकडून तयार करवून घेतलेला ड्रेस परिधान केला होता. हा अनुभव स्वत: सुष्मिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे.

काय म्हणाली सुष्मिता?

“सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गीय मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्यामुळे मिस इंडिया स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता आईने आणि मीना बाजारातील एक टेलर यांनी मिळून शिवले होते. हा ड्रेस तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत परिधान केला होता.”

सुष्मिताने मिस इंडिया ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली असल्याचे म्हटले जाते. त्या स्पर्धेत सुष्मिताला एक अनोखा प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुला एखादी ऐतिहासिक घटना बदलण्याची संधी मिळाली तर तु कुठली घटना निवडशील? या प्रश्नावर इंदिरा गांधी यांचा मृत्यू असे उत्तर सुष्मिताने दिले होते. या उत्तरामुळे सुष्मिता ‘मिस इंडिया’चा किताब जिंकली असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 5:01 pm

Web Title: sushmita sen miss india gown was made from sarojini nagar fabric mppg 94
Next Stories
1 अभिनय पाहून टिक-टॉक गर्लला दिली चित्रपटाची ऑफर, नंतर केलं ट्विट डिलिट
2 रामायणीतील लक्ष्मणाचा जुना फोटो होतोय व्हायरल, पाहून नेटकरी पडले प्रेमात
3 रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड; केआरकेचा उपरोधिक टोला
Just Now!
X