News Flash

दत्तक असल्याचं समजताच सुष्मिता सेनच्या मुलीची होती ‘ही’ प्रतिक्रिया

सन २००० मध्ये सुष्मिताने तिची मोठी मुलगी रेने हिला दत्तक घेतले तर २०१०मध्ये धाकटी मुलगी अलिशाला दत्तक घेतले

‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकून इतिहास रचणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे आणि त्या दोघींसह  सुष्मिताचे आईपेक्षा एका मैत्रीणीचे नाते आहे. सन २००० मध्ये सुष्मिताने तिची मोठी मुलगी रेने हिला दत्तक घेतले तर २०१०मध्ये धाकटी मुलगी अलिशाला दत्तक घेतले. आता सुष्मिताने रेनेला दत्तक घेतल्याचे सांगताच तिची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा केला आहे.

सुष्मिताने एका खेळाद्वारे रेनेला दत्तक घेतले असल्याचे सांगितले. ‘मी रेनेला एका खेळाद्वारे याबाबत समजवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही ऐकमेकींच्या विरुद्ध खेळत होतो. तेव्हा मी तिच्यासमोर दत्तक आणि बायोलॉजिकल असे दोन शब्द उच्चारले’ त्यावर रेने दोन मिनिट शांत झाली आणि म्हणाली ‘मला दत्तक घेतले आहे का?’ त्यावर सुष्मिता म्हणाली, बायोलॉजिकल बोरिंग शब्द आहे. तु माझ्यासाठी खूप खास आहेस, माझ्या हृदयाचा तुकडा आहे. त्यानंतर रेने सगळ्यांना सांगत होती, ‘तुम्ही बायोलॉजिकल आहात? बोरींग आहात’ मला रेनेचे वागणे पाहून फार आनंद झाला.

दरम्यान सुष्मिताने तिच्या मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल जाणून घेऊ शकतात याचा खुलासा केला. म्हणून रेने १६ वर्षांची असताना, ती कोर्टात जाऊन तिच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेऊ शकते असे देखील सुष्मीता पुढे म्हणाली.

‘मला रेनेला चुकिची माहिती देऊन तिचे मन दुखवायचे नाही. रेनेने मला विचारले की आई तुला खरज वाटतं का मी जाऊन ही माहिती घ्यावी? मला असं नाही म्हणायचं की तु त्यांच्या बद्दल जाणून घे, मला असे म्हणायचं की तुला त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे असे सुष्मिता म्हणाली. त्यावर रेनेने थोडावेळ शांत विचार केला आणि म्हणाली मला ते कोण आहेत हे जाणून घेण्यात रस नाही’ असा खुलासा सुष्मिताने केला.

सुष्मिता आणि तिच्या मुलींमध्ये एक वेगळेच नाते असल्याचे आपल्याला पाहायला मिळेते. सुष्मिता त्यांच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर करत असते. तसेच २०१८मध्ये सुष्मिताने एका कार्यक्रमादरम्यान येत्या काही दिवसात चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:02 pm

Web Title: sushmita sen reveals how her daughter renee reacted when she come to that she was adopted
Next Stories
1 अनोळखी व्यक्तीचा मेसेज चुकून वाचला अन् सुरू झाली सुष्मिताची प्रेमकहाणी
2 वयस्क व्यक्तीची भूमिका साकारण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना तापसीचं सडेतोड उत्तर
3 ऐश्वर्यासोबतच्या ‘कोल्ड वॉर’बाबत सुष्मिता म्हणते..
Just Now!
X