News Flash

Video : नोरा फतेहीच्या बेली डान्सला सुष्मिता सेन देतेय टक्कर

या गाण्याला आतापर्यंत ७.५ लाख व्ह्युज मिळाले आहे.

सुष्मिता सेन

१९९६ ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सुष्मिता सेनने गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. मात्र आता ८ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर ती लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुष्मिताने जरी ८ वर्ष चित्रपटांकडे पाठ फिरवली असली तरी तिच्या फिटनेस फंड्यामुळे ती कायम चर्चेत राहत होती. आता पुन्हा एकदा सुष्मिताच्या नावाची चर्चा सुरु झाली असून तिने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये ती ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. यात सुष्मिता बेली डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे गाणं १९९९ प्रदर्शित झालेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्याचा रिमेक आहे. या गाण्याला आतापर्यंत ७.५ लाख व्ह्युज मिळाले आहे. त्याप्रमाणेच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, ‘बीवी नंबर १’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘मैं हूं ना’, ‘फिलहाल’ या चित्रपटांमध्ये मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन झळकली असून २०१० मध्ये ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती. या चित्रपटानंतर तिने बॉलिवूडपासून फारकत घेतली होती. मात्र आता आठ वर्षानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडपटात झळकण्यास सज्ज झाल्याचं समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 12:54 pm

Web Title: sushmita sen sizzling belly dance on dilbar viral video
Next Stories
1 ‘तुर्रम खान’साठी राजकुमार राव- नुशरत भरुचा आले एकत्र
2 ‘हेमा मालिनी माझी आई असती तर..’
3 Stree box office collection: ‘स्त्री’ची १०० कोटींकडे वाटचाल
Just Now!
X