भारताच्या मानुषी छिल्लरने गेल्या आठवड्यात ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकला. जगभरातून आलेल्या १३० सौंदर्यवतींमध्ये मानुषीने बाजी मारली आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय तरुणी ठरली. नुकताच विमानातून प्रवास करताना मानुषीची माजी मिस युनिव्हर्स म्हणजेच अभिनेत्री सुष्मिता सेनशी भेट झाली. योगायोगाने झालेली ही भेट मानुषीसाठी अविस्मरणीय ठरली.

सुष्मिता आणि मानुषीच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अवघ्या काही सेकंदांची ही भेट होती. तिला भेटून झालेला आनंद मानुषीच्या चेहऱ्यावरही सहज झळकत आहे. सुष्मिताने नुकताच तिचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ट्विटरवर शुभेच्छा देताना मानुषीने विमानातील या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. ती भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, असे तिने लिहिले होते.

PHOTO : झहीर- सागरिकाच्या लग्नाचा पहिला फोटो

१९९४ मध्ये अवघ्या १६ वर्षांच्या वयात सुष्मिताने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सर्वांची मने जिंकण्याचे कसब अवगत असणाऱ्या सुष्मिताच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. तर १८ नोव्हेंबर हा दिवस मानुषीसाठी महत्त्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीच्या वाट्याला हे यश आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय.