02 December 2020

News Flash

…अन् सुष्मिताने रिनेसमोर उघड केलं खऱ्या आई-वडिलांविषयीचं सत्य

सुष्मितानं वयाच्या २५ व्या वर्षी मुलीला घेतलं दत्तक

अभिनयासोबत एक फिटनेस आयकॉन म्हणून अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिताचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ साली हैद्राबादमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला होता. सुष्मिताचे वडील हे भारतीय वायू सेनेत विंग कमांडर होते तर आई ज्वेलरी डिझायनर होती. सुष्मिताने १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुष्मिता अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सुष्मिता एक सिंगल पेरेंट असून ती तिच्या दोन्ही मुलींचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ करते. सुष्मिताने सिंगल पेरेंट बनून आपल्या पालकांना देखील अचंबित केलं होतं. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं असून त्यांचं नाव रिने आणि एलीशा असं आहे. तिने रिनेला २००० साली दत्तक घेतलं होतं तर एलीशाला २०१० मध्ये. लक्षवेधी बाब म्हणजे सुष्मिता २५ वर्षांची असतांना तिने रिनेला दत्तक घेतलं होतं.

१८ व्या वाढदिवशी तिने रिनेला तिच्या खऱ्या आई-बाबांविषयी सांगितलं. सुष्मिता म्हणाली, “मला माझ्या मुलीला चुकीची माहिती द्यायची इच्छा नव्हती. कारण आई-वडिलांसमोर गेल्यावर तिला वाईट वाटू नये. तुला जेव्हा कधी तुझ्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा होईल तेव्हा मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन.” असं वचन तिने आपल्या मुलीला दिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 6:01 pm

Web Title: sushmita sen told her daughter that she is adopted dcp 98
Next Stories
1 लग्नाआधी बिग बींनी लिहिले होते लव्ह लेटर, केबीसीमध्ये सांगितला किस्सा
2 गौहरने झैदसोबत केला डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 फिल्म सिटीमध्ये उभारला ‘जिगरबाज’ डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट
Just Now!
X