News Flash

‘हा’ अभिनेता करत होता सुष्मिता सेनला डेट

दोन वर्षे त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा आज ४३वा वाढदिवस आहे. रणदीपचा जन्म २० ऑगस्ट १९७६ रोजी हरयाणामधील रोहतक येथे झाला. १७ वर्षांचा असताना रणदीपने ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रणदीपने वेगवेगळ्या भूमिकांमुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘जिस्म 2’, ‘किक’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘सरबजीत’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्याने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे.

शालेय शिक्षण घेत असताना रणदीपच्या मस्तीखोर स्वभावामुळे सर्वजण त्याला ‘रणदीप डॉन’ म्हणून आवाज देत असत. त्यानंतर रणदीप पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रवानाला झाला. तिकडे पॉकेट मनीसाठी रणदीपने हॉटेलमध्ये नोकराचे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली होती. २०००मध्ये तो भारतात परत आला आणि एअर इंडिया कंपनीमध्ये काम करु लागला

दरम्यान रणदीपने मॉडलिंग आणि नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एका नाटकाच्या तालीम दरम्यान मीरा नायर यांची नजर रणदीपवर पडली. त्यांनी रणदीपला त्यांचा आगमी चित्रपट ‘मान्सून वेडिंग’साठी ऑडिशन देण्यास सांगितले. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. २०१०मधील ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटाने रणदीप खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला.

रणदीप मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेनला काही काळ डेट करत होता. त्यावेळी सुष्मिता आणि रणदीपच्या नात्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. सुष्मितानंतर रणदीपचे नाव अभिनेत्री नीतू चंद्रा आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंहसह जोडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी रणदीप आदितीराव हैदरीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:01 pm

Web Title: sushmita sen was dating this actor in 2004 avb 95
Next Stories
1 अपयशी ठरत असल्यामुळे निर्मात्याने मागितली होती जन्मपत्रिका – विद्या बालन
2 आलिया भट्टच्या मैत्रिणीशी असलेल्या कथित नात्याबद्दल के. एल. राहुल म्हणतो..
3 नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही- सोनाली कुलकर्णी
Just Now!
X