06 March 2021

News Flash

‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली सुष्मिता सेनची नणंद

राजीवने अचानक एक फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केल्याने चर्चेचा सुरु आहेत

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. आता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणारी अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. राजीव १६ जून रोजी गोवा येथे टीव्ही अभिनेत्रीसह डेस्टीनेशन वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु राजीवने अचानक एक फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

राजीव टीव्ही अभिनेत्री चारु असोपासह १६ जूनला लग्न बंधनात अडकणार होता. परंतु राजीवने अचानक त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर नोंदणी पद्धतीने विवाह बंधात अडकल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राजीवने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर चारुने लाल रंगाची साडी नेसली आहे. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर राजीव आणि चारू माउंट मेरी चर्च आणि सिद्धीविनायक मंदीरात आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते.

‘मी राजीव सेन चारु असोपला कायदेशीर रीत्या पत्नीच्या रुपात स्वीकार करत आहे’ असे कॅप्शन फोटो शेअर करताना दिले आहे. राजीव आणि चारुच्या लग्नाला १४ जून पासून सुरुवात होणार आहे. १४ जून रोजी त्यांचा साखरपूडा होणार असून १५ जून रोजी संगीत आणि मेहेंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच १६ जूनला धार्मिक पद्धतीने दोघे ही भोवल्यावर चढणार आहेत. त्यांचे लग्न बंगाली आणि राजस्थानी पद्धतीने पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण राजीव बंगाली आहे आणि चारू राजस्थानी.

चारूने ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजी’, ‘दिया और बाती हम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 12:25 pm

Web Title: sushmita sens brother rajeev marries tv actress charu asopa avb 95
Next Stories
1 या टॅटूमुळे आमिर खानची मुलगी सोशल मीडियावर चर्चेत
2 इशा देओलला कन्यारत्न, जाणून घ्या तिच्या बाळाचं नाव
3 सलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज
Just Now!
X