27 May 2020

News Flash

पत्नीसोबतचा इंटिमेट फोटो शेअर केल्याने सुष्मिता सेनचा भाऊ झाला ट्रोल, फोटो व्हायरल

असे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची गरज नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे

करोना या आजारापासून बचावासाठी राज्यात पूर्णपणे लॉकडाउनचे शासनाचे आदेश आहेत. तसेच सर्वत्र संचारबंदी लागू केल्याने नागरिकांना अत्यावश्यक गोष्टींशिवाय घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. अशा परिस्थितीमध्ये कलाकारही आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. ते सोशल मीडियावर त्यांच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करताना दिसतात. नुकताच अभिनेत्री सुष्मिता सेनच्या भावाने पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याने पत्नी चारु असोपासोबत क्वारंटाइनवेळ एकत्र घालवतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. पण हा फोटो शेअर केल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

View this post on Instagram

in love with quarantined days Ain’t you ? #stayhome

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9) on

राजीवने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच असे फोटो शेअर करण्याची गरज नव्हती अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच तुम्ही पती-पत्नी असलात तरी बेडरुमधील फोटो शेअर करु नये असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. हा फोटो शेअर राजीवने ‘या क्वारंटाइन दिवसाच्या मी प्रेमात आहे.. तुम्ही?’ असे कॅप्शन दिले आहे. पण सध्या सोशल मीडियावर याच फोटोची चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 4:48 pm

Web Title: sushmita sens brother rajeev sen and wife charu asopa shares intimate photos on instagram got trolled avb 95
Next Stories
1 तबलिकी मरकजच्या आयोजनावर खासदार नुसरत जहाँ म्हणतात…
2 स्टार कपलने ‘क्वारंटाइन टाइम’ म्हणत पोस्ट केले बेडरूममधील फोटो; नेटकऱ्यांनी झापलं
3 करोनाग्रस्तांसाठी धावला मराठमोळा अभिनेता : डॉक्टर म्हणून काम केलं सुरू
Just Now!
X