News Flash

सुष्मिता सेनच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

सुष्मिताने पोस्ट शेअर करत दिली माहिती

( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या मुलीचं रिनी सेनचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. सुष्मिताने स्वत: याविषयी माहिती दिली आहे. सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर रिनीच्या अकाऊंटचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.

“कृपया लक्ष द्या. माझ्या मुलीचं रिनीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. कोणत्या तरी मुर्ख व्यक्तीने हे काम केलं आहे. पण त्याला हे माहित नाही की रिनीने आता पुन्हा नवीन सुरुवात केली आहे”, असं सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताची लेक रिनी गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या ती एका लघुपटात ( शॉर्टफिल्म) काम करत असून सुटाबाजी असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. रिनीसोबत राहुल वोहरा आणि कोमल छाब्राने स्क्रीन शेअर केली आहे.

वाचा : नजरेचा बाण आणि ठसकेबाजपणा; ‘तुझ्यात जीव रंगला’तील ‘या’ नव्या वहिनीसाहेब आहेत तरी कोण?

 दरम्यान, सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी अभिनेता स्वप्नील जोशीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला वेळीच लक्षात आल्याने फसला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 8:32 am

Web Title: sushmita sens daughter renee sens instagram account hacked ssj 93
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक
2 हृतिक रोशन प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
3 ऋतिक रोशनची तक्रार मुंबई पोलिसांनी केली ट्रान्सफर, कंगना भडकली आणि म्हणाली…
Just Now!
X