News Flash

मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हृतिक-सुझान आले एकत्र

फोटो सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी घटस्फोट घेतला असला तरी त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते. ते मुलांसोबत नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात. आता सुझान आणि हृतिकने मुलाचा वाढदिवस एकत्र साजरा केल्याचे समोर आले आहे. वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगा रेहानचा १५वा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेक फोटोंचे कोलाज करुन तयार केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये रेहान त्याच्या कुटुंबीयांसोबत केक कापताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

सुझानने हा व्हिडीओ शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. ‘माझी लव्ह लाइफ, माझ्या आयुष्यातील आशेचा किरण, तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस, माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे कारण देखील तू आहेस’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच हॅशटॅग देत १५ वा वाढदिवस असे म्हटले आहे.

रेहानचा वाढदिवस साजरा करताना हृतिक आणि सुझानसोबत राकेश रोशन, पिंकी रोशन देखील दिसत आहेत. तसेच त्यांच्या मित्र परिवारामधील काही लोकं तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

काही दिवसापूर्वी सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली होती. सुझान अभिनेता अली गोनीचा भाऊ अर्सलनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम आहे. सुझान आणि अर्सलनने त्यांच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 1:21 pm

Web Title: sussanne khan celebrate son hrehaan 15th birthday with hrithik roshan avb 95
Next Stories
1 ‘३ इडियट्स’मधील रँचो आणि फरहानला झाला करोना, राजूला वाटते भीती म्हणाला..
2 सेटवर असतानाच आईचा फोन आला…, ‘अनुपमा’मधील अभिनेत्याच्या वडिलांचं निधन
3 …म्हणून वयाची ४० उलटल्यानंतरही अक्षय खन्ना अविवाहित
Just Now!
X