मार्च महिन्यापासून देशात करोना विषाणूने थैमान घाललं आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली असून यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश असल्याचं दिसून येत आहे. हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझान खान हिच्या आईला करोनाची लागण झाली आहे.

सुझानची बहिणी फराह खान अली हिने ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या आईला जरीन कतरक यांना करोना झाल्याची माहिती दिली आहे. “माझ्या आईची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून योग्य ते उपचार सुरु आहेत. कृपया सगळ्यांनी मास्कचा वापर करा”, अशी पोस्ट फराहने केली आहे.

दरम्यान, फराहची ही पोस्ट पाहिल्यानंतर जेनेलिया डिसुझा, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर या कलाकरांनी सुझानची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर या सेलिब्रिटींनादेखील करोनाची लागण झाली होती.