News Flash

सुझान खान डेट करते ‘बिग बॉस १४’मधील स्पर्धकाच्या भावाला? फोटोवरील कमेंट चर्चेत

सुझानच्या फोटोवर त्याने केलेली कमेंट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली तेव्हा हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही ते मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे. मात्र, आता सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुझान बिग बॉस १४मधील स्पर्धक अली गोणीच्या भावा अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता अर्सलनने सुझानच्या पोस्टवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेकअपविना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘आपण सर्वजण एकाच गेममध्ये आहोत. फक्त वेगळ्या स्तरावर’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सोबतच #WearYourAngel #BeBrave हे दोन हॅशटॅग दिले आहेत. तिच्या या पोस्टवर अर्सलनने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने कमेंट करत इमोजी वापरले आहेत.

आणखी वाचा : परवीन बाबीमुळे पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला, कबीर बेदींनी केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सुझान आणि अर्सलन गेल्या सहा महिन्यांपासून एकमेंकाना ओळखत आहेत. काही कॉमन मित्रमैत्रीणींमुळे त्यांची ओळख झाली. पण सध्या त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे.

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. सुझान आणि अर्सलनने त्यांच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. पण ते दोघे एकत्र पार्ट्यांना जात असल्याचे दिसते. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:20 pm

Web Title: sussanne khan rumoured boyfriend arslan goni reacted on photo avb 95
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’मधल्या ‘या’ कलाकाराचा मुलगा ठरतोय रॉकस्टार, त्याचा ‘हा’ व्हिडिओ पाहिलात का?
2 वैदेही परशुरामीच्या घरी ‘या’ नव्या पाहुणीचं स्वागत; नव्या वर्षाची नवी सुरुवात
3 माधुरी दीक्षित सोबत नोरा फतेहीचे ठुमके!; एकाच मंचावर दोन डान्सिंग क्विन
Just Now!
X