News Flash

सुझान नंतर बहीण फराहने देखील घेतला पतीसोबत विभक्त होण्याचा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..

फराहची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानची बहीण फराह खान अली लवकरच तिच्या पती डीजे अकील पासून विभक्त होणार आहे. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: फराहने दिली आहे.

ज्या प्रमाणे सुझान ही इन्टेरिअर डिझायनर आहे. त्याच प्रमाणे तिची बहीण फराह ही ज्वेलरी डिझायनर आहे. सोमवारी रात्री फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोत फराह आणि डीजे अकील आहे. “कधीकधी दोन व्यक्ती वेगळे होतात. कधीकधी ते एकमेकांना मागे टाकतात. आम्ही आनंदाने विभक्त झाले आहोत. माझा पती अकीलसोबत असलेलं माझं नातं गेल्या ९ वर्षांपासून बदलून मित्र-मैत्रिणी सारख झालं आहे. आणि हे सांगण्यासाठी आम्ही ‘आनंदाने विभक्त’ होत आहोत असे म्हणावे लागेल.” अशा आशयाचे कॅप्शन फराहने दिले आहे. हेच कॅप्शन डीजे अकीलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Ali (@farahkhanali)

फराहने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत सुझानने तुम्हाला दोघांना खूप खूप प्रेम असं म्हटलं आहे. तर सिनेसृष्टीतील अनेकांनी कमेंट करत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फराह आणि डीजे अकील यांची भेट एका पार्टीत झाली होती. दोन वर्ष रिलेशन मध्ये राहिल्यानंतर फेब्रुवारी १९९९मध्ये या दोघांनी लग्न केला. त्यांना दोन मुलं असून १८ वर्षाच्या मुलाचे नाव अझान तर १५ वर्षांच्या मुलीचे नाव फिझा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 5:34 pm

Web Title: sussanne khan s sister farah khan ali announces separation with dj aqeel it has been 9 years since our relationship status changed to just friends dcp 98
Next Stories
1 “कोणी मला खान आडनावाने बोलवू नये म्हणून..,” साजिद वाजिद मधील साजिदचा मोठा खुलासा
2 “फक्त लग्नासाठी मुलगी घेऊन ये…मंत्र मी वाचतो”- सोनू सूद
3 बर्थडे स्पेशल: “बॉलिवूडमध्ये माझा मित्र कोण माहित नाही पण माझा शत्रू तरी कुणी नाही?”
Just Now!
X