12 December 2019

News Flash

‘रोशन कुटुंबीयांसाठी ही कठीण वेळ’; सुझान खानची पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन यांच्यात तणाव असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन यांच्यात तणाव असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. एका मुस्लीम तरुणाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने कुटुंबीयांचा त्याला विरोध असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर रोशन कुटुंबीयांनी तिला मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चांडेल हिने केला आहे. या सर्व घडामोडी व सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा पाहता हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ‘रोशन कुटुंबीयांसाठी ही फार कठीण वेळ आहे,’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

‘गेल्या अनेक वर्षांपासून मी या कुटुंबाला ओळखत असल्याने हे सांगू शकते की सुनैना ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती सध्या वाईट परिस्थितीला सामोरं जात आहे. सुनैनाच्या वडिलांना आरोग्याशी संबंधित समस्या आहेत. या सर्व गोष्टींचा तिच्या आईवरही परिणाम झाला आहे. प्रत्येक कुटुंब अशा परिस्थितीतून कधी ना कधी जात असतं. तेव्हा तुम्ही या कुटुंबाचा आदर करा. या कुटुंबाचा मी भाग होती, म्हणूनच तुम्हाला ही विनंती करत आहे,’ असं सुझानने इन्स्टाग्रामवर लिहिलं.

वाचा : ‘मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंध असल्याने हृतिकच्या बहिणीला कुटुंबीयांकडूनच मारहाण’

बुधवारी कंगनाच्या बहिणीने ट्विटरवर रोशन कुटुंबीयांवर आरोप केले होते. सुनैना ही सतत कंगनाला फोन करून मदत मागत असल्याचंही तिने सांगितलं आहे. सुनैना दुभंगलेलं व्यक्तीमत्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत होत्या. सुनैनाने या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्टदेखील केलं होतं. या चर्चांनंतर सुनैनाने ‘माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं ट्विटदेखील केलं होतं. दुसरीकडे हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्यावर नुकतेच कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाले. एकंदरीत रोशन कुटुंबीयांसाठी ही कठीण परिस्थिती असल्याचं दिसत आहे.

First Published on June 20, 2019 12:39 pm

Web Title: sussanne khan share a post saying the family is facing a tough time hrithik roshan sunaina roshan ssv 92
Just Now!
X