बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझान खानने त्यांच्या घटस्फोटाची बातमी गेल्यावर्षी जाहीर केली तेव्हा त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला होता. त्यानंतर या दोघांनी याच वर्षी घटस्फोटाची याचिकाही दाखल केली. काही दिवसांपूर्वीच सुझानने हृतिककडून घटस्फोटाच्या बदल्यात ४०० कोटींच्या पोटगीची मागणी केल्याची बातमी चर्चेत होती. त्यावर हृतिकने या केवळ अफवा असल्याचे ट्विट केले होते. मात्र, ट्विटरपंतीयांनी सुझानची खिल्ली उडवण्याची संधी काही सोडली नाही. ट्विटवर सुझानविरुद्ध हास्यास्पद ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे, सुझानने ४०० कोटींची पोटगी मागितल्याचे नक्की नसले तरी निव्वळ चर्चासुद्धा तिला महाग पडल्याचे दिसते.