News Flash

‘आपल्या दोघात तिसरी’, सोशल मीडिया पोस्टद्वारे सखी-सुव्रतने दिली आनंदाची बातमी

त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले. नुकताच त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला असून ‘काल आमच्या दोघांमध्ये तिसरी आली’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर सुव्रत आणि सखीच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे.

सुव्रत आणि सखीने एक नवी कार खरेदी केली आहे. त्याचा आनंद साजरा करताना त्यांनी कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुव्रतने ‘१९९६मध्ये कार घेण्याचे माझ्या आईचे स्वप्न होते. पण जवळपास २५ वर्षांनंतर तिचे स्वप्न सत्यात उतरले. मध्यमवर्गीय कुटुंबातील इतर मुलांप्रमाणेच ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी सेकंड हँड कार होती परंतु केवळ काही काळासाठी. त्यामुळे माझी पहिली कार ही सेकंड हँड होती आणि दुसरी कार ही फर्स्ट हँड’ असे म्हटले आहे.

पुढे तो म्हणाला, ‘अनेक वर्षे गाडी न घेता राहण्याचा प्रयत्न केला पण पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहणे शक्य झाले नाही. पुन्हा विजेवर चालणारी गाडी घेतली तर त्याला पूरक अश्या साधन यंत्रणा भारतात अजून तरी उपलब्ध नाहीत. शेवटी मी पेट्रोलवर चालणारी गाडी घेतली. मग माझ्या समाधानासाठी मी एक गोष्ट केली. मी माझ्या गाडीचे energy audit करून घेतले. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून मी किती धूर हवेत सोडणार हे काही तज्ज्ञांकडून समजून घेतले. तो धूर शोषून घ्यायला पुढच्या ५-६ वर्षात साधारण शंभरेक झाडे लावायचा मानस आहे. काल त्याची सुरूवात म्हणून गाडीचे पेढे वाटण्याआधी काही वृक्ष लावायला म्हणून एक रक्कम प्रदान केली आहे. असेच दार सहा महिन्याला घडावे अशी इच्छा आहे. मग ही झाडे मी गाडी वापरायची थांबवल्यावरही धूर शोषत राहतील. तुम्हाला ही कल्पना आवडली असल्यास मी तर म्हणीन हे नव्या युगाचे ritual म्हणून आपण अध्यरुत करूया. दरवेळी नवीन गाडी घेतली की पुढची काही एक वर्ष आपण झाडे लावायची. आपला धूर आपणच शोषून घ्यायचा. अर्थात हे थोडे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हायला हवे म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा होईल,अन्यथा चुकीची वृक्षलागवड केल्याने तोटाही होऊ शकतो. असो.’

पुढे सुव्रतने आनंद व्यक्त करत, ‘तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आपण फक्त ऐहिक यशावर स्वतःचे मूल्यमापन करू नये पण तरी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाला अश्या गोष्टी आयुष्यात आल्यावर आनंद होतोच’ असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुयश टिळक, मिथिला पालकर अशा अनेक कलारांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 11:59 am

Web Title: suvrat joshi and sakhi gokhale buy new car avb 95
Next Stories
1 राखीच्या आईच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान
2 महिलेने खेचली दीपिकाची पर्स!, गाडीत बसणंही झालं कठीण
3 कंगना करतेय भावाच्या घराची सजावट, शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X