News Flash

दिल..दोस्ती..शुभमंगल! सुव्रत-सखी अडकले लग्नाच्या बेडीत

सुव्रत-सखीला आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा लग्नसोहळ्याचे फोटो..

सखी गोखले- सुव्रत जोशी

अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी लग्नबंधनात अडकले. मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी सुव्रत-सखीचा साखरपुडा झाला.

या विवाहसोहळ्यात सखीने हिरव्या रंगाची पैठणी, नथ, कोल्हापुरी साज, पाटल्या असा अस्सल मराठमोळा पेहराव केला. तर सुव्रतनं कुरता, शाल आणि टोपी असा पेहराव केलेला. या सोहळ्याला अभिनेता जितेंद्र जोशी, चिन्मयी सुमित, सुमित राघवन, अमर फोटो स्टुडिओची सगळी टीम, आरती वडगबाळकर, रेशम प्रशांत, सायली संजीव, पर्ण पेठे, अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि सुनील बर्वे यांनी हजेरी लावली. सखी ही अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या आहे.

 

 

बुधवारी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगला. त्यानंतर गुरुवारी लग्नाचे विधी संपन्न झाले. सुव्रत-सखीला आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 9:26 am

Web Title: suvrat joshi and sakhi gokhle wedding ceremony
Next Stories
1 ए. आर. रेहमान यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण
2 लव्हबर्ड्स अर्जुन-मलायका एकाच कारमधून पार्टीला
3 आयआयटी परीक्षांर्थींसाठी येतोय ‘कोटा फॅक्टरी’
Just Now!
X