एकविसाव्या शतकात व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या आघाडीच्या सोशल मीडियाचा प्रभावी पद्धतीने वापर करत कलाकार एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपली मते व्यक्त करतात. तसेच चाहत्यांना हे कलाकार सध्या काय करत आहेत या गोष्टींचीही माहिती मिळते. मात्र, हाच सोशल मीडिया सध्या कलाकारांना नकोसा झाला आहे. कलाकारांनी केलेले एखादे वक्तव्य, फोटो, व्हिडीओ यांमुळे ते बऱ्याचदा ट्रोलिंगचे शिकार होतात. या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. तर काही काळासाठी सोशल मीडियापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेणाऱ्या कलाकारांची संख्याही वाढते आहे.

कलाकार असा निर्णय का घेत आहेत याबद्दल अभिनेता सुयश टिळकने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याचं मत मांडलं.

वेळप्रसंगी मीसुद्धा सोशल मीडियाला रामराम करेन, असा इशाराही सुयशने या मुलाखतीत दिला.