News Flash

दिल्लीच्या जंतर मंतरवर झाली स्वामी ओमची धुलाई

याआधीही स्वामी ओमला त्यांच्या बेताल विधानामुळे जबर मार बसला आहे

स्वामी ओम

टिव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे स्पर्धक म्हणून ओळख मिळवलेल्या स्वामी ओम जे काही करतात त्यातून वाद निर्माण होतात. आतापर्यंत त्यांनी वादात अडकतील अशी अनेक वक्तव्ये केली आहेत. आतापर्यंत त्यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी चोपही देण्यात आला. इतिहासाचीच पुनरावृत्ती मंगळवारी झाली असेच म्हणावे लागेल.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘नॅशनल पँथर पार्टी’कडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी स्वामी ओमही तिथे उपस्थित होते. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी त्यांना कोणीही बोलावले नव्हते. ते स्वतःहून त्यांचे सहकारी मुकेश जैनसोबत तिथे आले होते.

रंगभूमी हीच आई आणि पहिलं प्रेम- मयुरेश पेम

आंदोलनादरम्यान काही महिलांनी त्यांना तिथे पाहिले आणि त्यांच्या रागाचा पाराच चढला. ओम यांना पाहताचक्षणी महिलांनी त्यांचा विरोध करायला सुरूवात केली. महिलांनी त्यांना पूर्णपणे घेरले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी पळण्याचाच मार्ग स्विकारला. पण यादरम्यान त्यांना एका महिलेने जोरात कानशिलात लगावली.

या दरम्यान स्वामी ओमचे सहकारी मुकेश जैनही त्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावले. मुकेश यांनी एका महिलेला इतक्या जोरात मारले की ते पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्यालाही चांगलाच चोप दिला. एका महिलेला इतक्या भयंकररित्या कसे मारु शकतो असाच प्रश्न त्या लोकांच्या मनात असावा हे यावरुन स्पष्ट होते. लोकांचा राग पाहता मुकेशही पळून जायला लागला. पण लोकांनी तरीही त्याला पळत पळत मारले. या सगळ्या प्रकरणात स्वामी मात्र एका कोपऱ्यात जाऊन लपले होते. पण लोकांचा प्रक्षोभ एवढा होता की स्वामी ओमला शोधून परत त्यांना चोप दिला. लोकांची गर्दी पाहून ओम यांनी खुर्चीलाच आपली ढाल बनवली. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी स्वामी ओम आणि मुकेश जैन यांना कसेबसे त्या जमावापासून वाचवले.

याआधीही स्वामी ओमला त्यांच्या बेताल विधानामुळे जबर मार बसला आहे. नथुराम गोडसेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी ओम यांना गोडसे समर्थकांनी चोपले होते. नथुराम गोडसेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात ओम स्वामी यांच्यासारखी व्यक्ती नको असा गोडसे समर्थकांचा आक्षेप होता. या कार्यक्रमात स्वामी ओम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र स्वामी ओम यांच्यासारखा स्वयंघोषित आणि ढोंगी बाबाला बोलावून नथुराम गोडसेचा अवमान झाल्याचा आक्षेप काही मंडळींनी घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 11:30 am

Web Title: swami om beaten at delhi jantar mantar
Next Stories
1 Mom Movie Collection: श्रीदेवीची घोडदौड सुरूच
2 ट्रोल करणाऱ्याला रेणुका शहाणेंनी शिकवला धडा
3 कथा पडद्यामागचीः रंगभूमी हीच आई आणि पहिलं प्रेम- मयुरेश पेम
Just Now!
X