14 August 2020

News Flash

‘स्वामिनी’ मालिकेमध्ये मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार शनिवारवाडा !

ही भूमिका कोण साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

…आणि अखेर तो क्षण आला. स्वामिनी मालिकेतील छोट्या रमाबाई आता मोठ्या झाल्या आहेत. लॉकडाउननंतर आता हळूहळू मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. त्यासाठी सरकारने काही नियमही आखले आहेत. त्यामुळे आता मालिकांमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेचे देखील चित्रीकरण सुरु झाले आहे. या मालिकेचे नवे भाग २१ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘स्वामिनी’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स आणि सेटचे सॅनेटायझेशन करण्यात आले. येत्या भागांमध्ये प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत असलेल्या आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत. मोठ्या रमेच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजळणार आहे. मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले. आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पाडेल? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील? रमा आणि माधव यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना कोणाची साथ लाभली? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 4:02 pm

Web Title: swamini serail shooting started avb 95
Next Stories
1 स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…
2 चित्रपटगृह बंद! आता ‘ओटीटी’वर होणार एकाच दिवशी ४ चित्रपटांची टक्कर
3 विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; कुख्यात गुंडावर येतोय चित्रपट
Just Now!
X